Sunday, August 13, 2006

ड्राय-क्लीनर

काल dry-cleaning चे कपडे आणायला गेलो होतो. दुकानदार भारतीयच वाटत होता. त्याने TV कडे बघत (Israel-Lebanon news) म्हणले
"३रे महायुद्ध होणार आता !" मी जरा शंकित नजरेने जेंव्हा त्याच्याकडे बघितले तेंव्हा म्हणाला
"भारत सुद्धा पाकिस्तान वर हल्ला करणार आहे".
मी म्हणलो: नाहि शक्य ते, आणि तसे व्हायला पण नको.
"मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यात पाकिस्तान चा हात आहे.. होणारच युद्ध."
मी: त्यांनी (सरकारने) काहि ठोस पुरावे सादर केले का?....
"वादच नाहिये कि पाकिस्तान चा हात आहे म्हणून.."...
मी: मान्य आहे पण तरी युद्ध करण्याइतपत .. म्म्म्म .. माहीत नाहि...
मग मी विचारले, तुम्ही भारतीय का?..
"नाहि केनियन.. पण भारतीय वंशाचा... आणि तुम्ही पाकिस्तानी असणार.."
(हे सगळे संभाषण अर्थात इंग्लिश मधे चालू होते.)...
मी: नाहि, मी खरे तर पुण्याचा..मुंबई पासून २ तास..
माझ्या मित्राने माझ्याकडे साशंक नजरेने बघत... भारतीय आहे तर मग 'हा असा कसा?' हा विचार सुरु केला असावा..
आणि मी विचार करत बाहेर पडलो कि मी नक्कि काय म्हणालो ज्यामुळे त्याने मला पाकिस्तानी ठरविले...

खरे तर मी एका सहिष्णु आणि समंजस भारतीयासारखाच बोललो न्हवतो का? ..

पण आजची भारतीय मानसिकताच बदलत चालली असावी (ती व्यक्ती केनियन असली तरी माझ्यासाठी हा अनुभव नवीन नाहि.)... राजकीत नेत्यांनी ज्या ज्या गोष्टिंचे मतांसाठी भांडवल केले , त्या त्या सर्व गोष्टि आज अंगाशी येत आहेत आपल्या.. भाषाभेद, प्रांतभेद, जातभेद, धर्मभेद, कर्मभेद, अर्थभेद, वर्णभेद (आर्यन, द्रविडीयन)... अश्या अनेक भेदांमध्ये आज भारताची अस्मिता हरवली आहे.. स्पष्ट बोलयचे तर मला असे वाटते कि अस्मितेची व्याख्याच बदलून गेली आहे आज.. आणि हे फ़क्त भारतातच नाही तर जगभर खरे आहे.. अस्मिता, अभिमान म्हणजे दुसर्याला पाण्यात पहाणे, द्वेष करणे, आणि कमी लेखणे असा काहिसा अर्थ झाला आहे अशी खूप भीतिदायक कल्पना बर्याच वेळा मनाला दचकवून जाते... जर मी कोणाला माझ्यापेक्षा कमी नाहि लेखले तर मला 'स्वाभिमान' नाहि असे काहिसे विचीत्र गणित आजूबाजूलाहि दिसते..

अरे गुन्हेगाराला माफ़ करा असे कोण म्हणत आहे ?... पण प्रत्येक जण फ़क्त मारामारी आणि युद्धाची भाषा बोलतो.. हिंसक मानसिकता आज एक शोर्याचे प्रतिक बनली आहे... 'खरी शूरता हि सामंजस्यात आणि संयमात आहे' हि एक कवी-कल्पना नसून असे सत्य आहे ज्यापासून भित्रट माणूस दूर पळत आहे. हिंसा खरे तर भीती व दुर्बलते ला सामोरे न जाण्यासाठी चढवलेला मुखवटा आहे ह्या अर्धवटरावांनी..