Saturday, July 22, 2006

Marathi people.. same thoughts in Marathi..

मित्रहॊ,
माझे "Marathi people are loosing their cultural identity" ह्याबद्दलचे काहि वैयक्तिक विचार.....

मराठी माणसाची संस्कृती हि खूप गहनतेने विचार करायची गोष्ट आहे. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि इतिहास नजीकच्या भूतकाळात मराठी माणसाच्या सांस्कृतिक परिवर्तनाला बहुतांशी जबाबदार आहे असे माझे मत आहे.
महाराष्ट्रीय (किंवा मराठी म्हणा) लोक हि उत्तर व दक्षिण भारतामधला दुवा आहेत. नुसता दुवा नाही तर एक सुंदर मिश्रण आहे दोहोंचे. संगीत, खाणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बौद्धिक क्षेत्रात हे अगदी प्रकर्षाने जाणवते. अजून एक ऊत्तम उदाहरण म्हणजे सण. त्यात दोन्हीकडच्यांशी जे नाते आहे ते नक्की अभ्यास करण्याजोगे आहे. गेले कित्येक वर्षे आपण सर्वसमावेषक आणि समजूतदार (हिंदू संस्कृती ज्यासाठी प्रसिद्ध आहे) समाज म्हणून वागत आहोत. विविधतेने रंगलेल्या भारतामध्ये आपण मराठी लोक एक सांधणारा दुवा आहोत.
मुस्लिम आक्रमणांमुळे उत्तर भारताच्या मूळ संस्कृती मध्ये नक्किच आमूलाग्र बदल झाला आहे. आणि हिंदी भाषेवरचा उर्दुचा प्रभाव कोणीच नाकारु शकणार नाही. दक्षिण भारत त्यामानाने सुरक्षित राहिला आहे आणि बर्याच प्रमाणात आपली मूळ संस्कृती जपू शकला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात उत्तर भारतात हिंदीला राष्ट्रभाषेचा मान मिळाल्यामुळे (practically atleast .. ह्याची तांत्रिकता मी लवकरच पडताळून बघेन.. माझी माहिती अपुरी आहे ह्याबद्दलची) त्यांचा प्रश्ण मिटला. दक्षिण भारतात राजकीय नेत्यांनी "दक्षिणेवर होणार्या अन्यायाचे" (योग्य वा अयोग्य) भांडवल करून त्यांची भाषा (खरे तर त्यांची खुर्ची) 'जपली'.
मुंबई East India Companyची राजधानी होती आणि नंतर ती भारताची औद्योगिक व वित्तीय राजधानी झाली. त्यामुळेच तेंव्हा आणि आजहि भारतातील विविध राज्यांमधून लोक मुंबईकडे धाव घेतात. नैसर्गिकताच अशी आहे माणसाची कि परप्रांतात आले कि लोक एकत्र व एकमेकांची काळजी घेत राहतात. हे चित्र तुम्हाला US मध्ये भारतीयांच्या (व मराठी लोकांच्या सुद्धा) बाबतीत सर्व मोठ्या व छोट्या शहरांमध्ये दिसेल. आपण मराठी लोकांना मात्र परप्रांतात न जाताच घरीच (मुंबई मध्ये) सगळे मिळाले आणि म्हणूनच आपल्यामध्ये फ़क्त आपल्या लोकांनाच मदत करायची प्रवॄत्ति तयार झाली नाहि आणि आज ती तशी दिसून येत नाहि.
स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसाचे योगदान हे नेत्यांच्या स्वरुपाने व 'सामान्य योध्यांच्या' स्वरुपाने हि भरपूर दिसून येते. ब्रिटीशांविरुद्ध पूर्ण भारत एकत्र करण्याचे काम हे तात्या टोपेंनी केले होते. नंतर टिळक, आगरकर, सावरकर इ. अनेक मराठी स्वातंत्र्यसैनिकांनी महाराष्ट्राला स्वातंत्र्ययुद्धाचे रणांगण बनवले. भारत छोडो आंदोलनाची बीजे आणि All India Congress Committee ची ती प्रसिद्ध बैठक हि मुंबई मध्येच झाली. मुंबई ह्या राजधानी सहीत महाराष्ट्राची निर्मिती हि १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळी मुळे झाली. त्याच्या विजयामागे मुंबई व मराठी लोकांची एकच व अविभाज्य संस्कृती हेच होय.
भारताच इतिहास व त्यामधले मराठी लोकांचे योगदान ह्यामुळे मी मराठी आहे ह्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. आपल्यातील सर्व एकत्रितपणे राहण्याची इच्छा, सामंज्यस्याची भावना, सर्वसमावेषकता, आणि कुठलाहि गाजावाजा न करता सर्वांमध्ये मिसळून राहण्याची तयारी, हे मराठी लोकांचे रुजलेले व विकसित झालेले गुण आहेत. जर कोणी त्याला स्वतःच्या अयशस्वीते मूळे अवगुण म्हणत असेल तर मला त्यांची किव येते आणि मी अश्या विचारांशी पूर्णपणे असहमत आहे. माझ्यामते मराठी माणूस सर्व क्षेत्रांमध्ये, भारतात व जगभर, भरघोस योगदान देत आहे आणि ह्यापूर्वी सुद्धा त्याने ते दिलेले आहे.
मराठी भाषेबद्दल म्हणाल तर मला नक्किच स्थिती चिंताजनक वाटते पण आशेचे किरण पण आहेत आजूबाजूला. माझ्या आताच्या पुणे भेटित बहुतेक सार्वजनिक ठिकाणी (लक्ष्मी रोड वर सुद्धा) संभाषणाची सुरूवात हि हिंदी मध्ये होते हे बघून थोडेसे वाईट वाटले. वाटायला हवे कि नाहि, माहित नाहि. पण त्याचवेळि हिंदी चित्रपटांमधिल मराठी चे वाढलेले प्रमाण, हिट अल्बम (ऐका दाजीबा इ.),हिट कविता/गाणी (दिवस असे कि, कैफ़ियत, नामंजूर, इ.), हे सगळे उत्साहवर्धक व आशाकारक आहे.
सारांश करायचा तर माझे असे मत आहे कि मराठी लोकांनी हि जाणीव सदैव राखली पाहिजे कि आपली मराठी भाषा, लोक व संस्कृती साठी काहि जबाबदारी आहे. त्याचवेळी भारताची जगातील एक सक्षम व प्रबळ अर्थव्यवस्था बनण्याकडे चालू असलेली वाटचाल थांबवण्यासाठी परकीयांचे जे अस्थॆर्य माजवण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यात आपण नक्कीच भर घालता कामा नये. दुसरे म्हणजे, आपली (मराठी) परंपरागत व विकसित झालेली जी विचारसरणी आहे त्याचा विचार करुन मगच बाकिच्या राज्यातील (काहि संकुचित मनोवृत्तिची) लोक कशी वागत आहे हे बघून स्वत:शी तूलना करावी.
धन्यवाद.

3 Comments:

Blogger Tulip said...

Good post. Shows yu do 'think':).

6:52 AM  
Blogger Saatwik said...

Thank you.
I am new to the whole blogging thing..I like it..
Is this the only way to reply to any comments ? ...
tc.

8:42 AM  
Blogger Tulip said...

This comment has been removed by a blog administrator.

10:19 AM  

Post a Comment

<< Home